राफेल डीलच्या मुद्द्यावरून शिवसेना-कॉंग्रेस साथ साथ

sanjay-raut-

नवी दिल्ली : राफेल डीलसाठी मोदी सरकारने फक्त अनिल अंबानी यांच्या रिलायन्सचे नाव सुचवले होते. त्यामुळेच फ्रान्सच्या डॅसो एव्हिएशेन कंपनीकडे इतर कोणताही पर्याय नव्हता, असे विधान फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांनी केल्याने एकच खळबळ उडाली होती. त्याचाच आधार घेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशाचा चौकीदारच चोरी करून गेला, अशी टीका पंतप्रधानांचे नाव घेऊन केली.

राफेल डीलच्या मुद्द्यावरून देशभरात रान पेटविण्याच्या कॉंग्रेसच्या प्रयत्नांना आता शिवसेनेचं बळ मिळालं आहे. राफेल डील प्रकरणावर आतातरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया द्यायला हवी असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद आणि नरेंद्र मोदी हे चांगले मित्र आहेत. त्यांनी अनेकदा एकमेकांच्या गळ्यात-गळे घातले आहेत. त्यामुळे ओलांद यांच्या या दाव्यावर मोदींनीच उत्तर द्यायला हवे. त्यांच्याशिवाय अन्य कोणी यावर प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही.

मोदी सरकार हे आजवरचे सर्वात भ्रष्ट सरकार – पृथ्वीराज चव्हाण

पंकजाताई फक्त भाषणच सुंदर करतात : नीलम गोऱ्हे