‘भाजपकडून शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढण्याचं कारस्थान’

blank

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. तसेच शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते विनायक राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढण्याचं कारस्थान भाजप करत आहे. ही दुर्बुद्धी भाजपाला सुचलेली आहे. राज्यसभेतील शिवसेना खासदारांची बैठक व्यवस्था बदलल्याचं माझ्या कानावर आलं आहे, असे यावेळी बोलताना ते म्हणाले.

तसेच पुढे बोलताना म्हणाले, ‘शिवसेनेचा NDA च्या बैठकीवर बहिष्कार नाही. भाजपनेच आम्हाला या बैठकीचं आमंत्रण दिलेलं नाही. त्यामुळे तिथे जाण्याचा प्रश्नच येत नाही. लोकसभा अध्यक्षांनी बोलावलेल्या बैठकीत आम्हाला अधिकृत आमंत्रण आहे त्याला आम्ही जाणार आहोत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसेनेने विधानसभेचा निकाल लागल्यानंतर लगेचच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हवं अशी भूमिका बोलून दाखवली. मात्र या मागणीला भाजपने स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यामुळे भाजप शिवसेनेतील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला होता. यानंतर आता शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची एकत्रित सत्ता स्थापन करणार असल्याचे बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या