मुंबई: दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुंबईत दाखल झाले. मुंबईत पोहोचताच त्यांनी काही खास नेत्यांची बैठक घेतली आणि थेट राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेण्यासाठी राजभवन गाठले. एकनाथ शिंदे गटातील बंडखोरीनंतर महाविकास आघाडी अल्पमतात आली आहे, असा दावा करत फडणवीस यांनी राज्यपालांचा हस्तक्षेप मागितला. तसेच आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावे, अशी विनंती केली आहे. यानंतर शिवसेनेने याविरोधात थेट सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे.
दरम्यान सदरील आदेशाच्या विरोधातील शिवसेनेच्या याचिकेवर आज पाच वाजता सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर आजच सुनावणी होणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. दरम्यान या सर्व प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांकडे आम्ही १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी प्रस्ताव दिला होता. तो अडीच वर्षांपासून प्रलंबित असून आता बहुमत चाचणीबाबत मात्र ते चांगलीच तत्परता दाखवत आहेत. राफेलपेक्षा राज्यपालांचा वेग जास्त आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. तसेच १६ आमदारांना अपात्र करण्यासंदर्भातील विषय सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना बहुमत चाचणी घेणे बेकायदेशीर आहे. आम्ही याविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहोत, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान फडणवीसांच्या पत्रानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे सकारनं बहुमत गमावलं असं मानलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या (गुरूवारी) पर्यंत राज्यपालांनी मुदत दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Sanjay Raut : ‘त्या’ डबक्यातून बाहेर पडा व महाराष्ट्राच्या स्वर्गात या; संजय राऊतांचे बंडखोरांना आवाहन
- Sanjay Raut : “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची आस धरून बसले असतील तर…”, संजय राऊतांचा टोला
- Political Crisis : मोठी बातमी : ‘विधानसभेत बहुमत सिद्ध करा’, राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- Sanjay Raut : ‘त्या’ दिलाशाचे लाभार्थी कोण ते भविष्यात उघड होईलच; संजय राऊत
- Sandeep Deshpande : ‘काळजी’च्या नावाने उद्धव ठाकरे पाहात आहेत त्यांचा स्वार्थ?; ‘मनसे’चा व्यंगचित्रातून प्रहार
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<