Shivsena । मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून (Andheri East Election) भाजपने माघार घेतली आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरेपर्यंत मोठे राजकारण पाहायला मिळाले. मात्र भाजपाच्या या निर्णयावर समिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यानंतर आज शिवसेना मुखपत्र सामानातून या सर्व गोष्टींवर भाष्य करत विरोधकांवर टीका देखील करण्यात येत आहे.
शिवसेना अंधेरीतील विधानसभा पोटनिवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकणारच होती. 2014 साली रमेश लटके भाजपशिवाय येथे जिंकले व 2019 साली भाजपच्या युतीत जिंकले. म्हणजे हा मतदारसंघ स्वाभिमानी शिवसेनेस मानणारा आहे. आताही मतदानाच्या माध्यमातून तेथील लोकांच्या मनातील संताप, चीड व सहानुभूतीचा लाव्हा धगधगत्या मशालीसारखा उसळून बाहेर पडला असता. ठीक आहे. मैदानात आज नाहीतर उद्या उतरू. आज तरी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या सगळय़ांचे विनम्र आभार! आमच्या मनात कोणतीही जळमटे नाहीत. मराठी एकजूट तुटू नये ही आमची आजही इच्छा आहे!
पूर्व समुद्र आणि पश्चिम समुद्र या नावातच काय तो वेगळेपणा असतो. बाकी सगळे पाणी एकच असते. राजकारणही ‘ज्ञानेश्वरी’च्या या तत्त्वाप्रमाणेच आहे. राजकीय पक्ष, त्यांचे विचार यांत भिन्नता असते. माणसांतील स्वभावदोष तेथेही असतात. पुन्हा स्वार्थाची बजबजपुरीही आहेच. मात्र सध्याच्या राजकारणात सगळे पाणी एकच आहे हे अंधेरी पोटनिवडणुकीतील घडामोडींनी दाखवून दिले. भारतीय जनता पक्षाने अंधेरी पोटनिवडणुकीतून मोठय़ा मनाने माघार घेतली. त्यामुळे एक झाले, भाजपासही मन आहे व ते मोठे आहे हे दिसून आले.
पंतप्रधान मोदी देशातील जनतेशी संवाद साधतात. ‘मन की बात’ करतात. म्हणजे मनाचा मनाशी संवाद होतो. तीच ‘मन की बात’ अंधेरी पोटनिवडणुकीच्या बाबतीत महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी राखली, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे आमचे कर्तव्यच आहे. आमदार रमेश लटके यांच्या निधनाने विधानसभेची ही पोटनिवडणूक लागली. लटके स्वर्गवासी झाले तेव्हा शिवसेना एकसंध होती व पोटनिवडणूक लागली तेव्हा भारतीय जनता पक्षाने मिंधे गटास हाताशी धरून शिवसेनेवर फुटीचा घाव घातला होता. शिवसेना हे ऐतिहासिक नाव, धनुष्यबाण हे चिन्हही निवडणूक आयोगाने गोठवले.
शिवसेनेस मशाल चिन्ह मिळाले, पण स्वर्गीय लटके यांच्या पत्नीस उमेदवारी जाहीर केल्यावर त्यांचा महानगरपालिकेतील नोकरीचा राजीनामा अडवून ठेवण्याची एक हलकट खेळी झाली. त्यात अखेर उच्च न्यायालयास हस्तक्षेप करावा लागला. हे काही महाराष्ट्राच्या महान परंपरेला, संस्कृतीस धरून झाले नाही. महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा महानच आहे. त्या परंपरेच्या सुरक्षेसाठी शिवसेनेचा जन्म झाला. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला व त्या लढय़ातून मिळालेल्या मुंबईसह महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवसेनेने जन्म घेतला. त्याच शिवसेनेला जमिनीत गाडण्याची भाषा भाजपकडून झाली ही काही आपली परंपरा नाही, पण अघोरी सत्तेपुढे सर्व शहाणपण, परंपरा गुडघे टेकतात. अंधेरी पोटनिवडणुकीच्या निकालात
महत्वाच्या बातम्या :
- Sushma Andhare । उद्धव ठाकरेंसोबत शिंदे गटातील अनेक आमदार परत येणार? सुषमा अंधारेंचा दावा
- Bhaskar Jadhav | राणेंवर खालच्या दर्जाच्या शब्दांमध्ये केलेली टीका भोवणार?, भास्कर जाधवांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार
- Nitesh Rane । “भास्कर जाधव खरंच शिक्षकाचे पुत्र आहेत का, हा संशोधनाचा विषय”; नितेश राणेंचा पलटवार
- Kishori Pednekar । “कुणाच्या कळा, कुणाचं बाळंतपण…”; किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंवर घणाघात
- Bhaskar Jadhav । “मग तू काय म्हशी भादरत होतास?”; भास्कर जाधवांचा राणेंवर घणाघात