पडत्या काळात शिवसेनेने साथ दिली आमचा 25 वर्षांपासूनचा ऋुणानुबंद – भुजबळ

टीम महाराष्ट्र देशा : पडत्या काळात शिवसेनेने साथ दिली. माझ्याबद्दल त्यांनी दोन चांगले शब्द बोलले आमचा 25 वर्षांपासूनचा ऋुणानुबंद आहे. म्हणून काल पंकज भुजबळ यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांचे आभार व्यक्त केले. असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सांगितल आहे. तर ज्यावेळी मला जामीन मंजूर झाला त्यावेळी पहिला फोन शरद पवार यांनी केल्याचे गुपित सुद्धा भुजबळांनी यावेळी उघड केल. तब्बल २ वर्षानंतर छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

तुरुंगातील अनुभव कसा होता असे विचारल्यानंतर भुजबळ मिश्किलपणे हसत म्हणाले की, ‘ज्यावे त्याच्या वंशा तेव्हा कळे’ असे उत्तर दिले. महाराष्ट्र सदनबद्दल विचारले असता भुजबळ म्हणाले की, ज्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या आरोपात मला तुरुंगवास झाला, आज त्याच महाराष्ट्र सदनाचा सर्वजण लाभ घेत आहेत, देशात या सदनाचा लौकीक आहे.

दरम्यान, “स्वादुपिंडाच्या त्रासावर उपचार सुरु आहेत. काही दिवस कुटुंबीयांसोबत राहणार आहे. आराम करेन. अजून पूर्ण बरा झालो नाही.”, तसेच, पहिल्यासारख्ये सक्रीय राहता येणार नाही, अशी अट डॉक्टरांनी घातल्याच राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट केल आहे.