जो वडिलांना विसरला, तो मतदारांना काय लक्षात ठेवणार? शिवसेनेचा निरंजन डावखरेंवर हल्लाबोल

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात पदिवीधर मतदारसंघाची निवडणूक अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली असताना राज्यात सर्वात जास्त प्रतिष्ठेची बनलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूकीत भाजप आणि शिवसेनेत चांगलीच खडाजंगी सुरु आहे.

वडिलांमुळेच ज्यांना ओळख मिळाली ते भाजपचे निरंजन डावखरे प्रचारात वडिलांचं नाव कुठेही घेत नाहीत. त्यामुळं जो वडिलांना विसरला, तो मतदारांना काय लक्षात ठेवणार ? असे म्हणत शिवसेनेनं निरंजन डावखरेंवर हल्ला चढवला.

इशरत जहाँ प्रकरणात वसंत डावखरे यांनी तिच्या कुटुंबियांना मदत केली होती, आणि त्यांचाच मुलगा आता भाजपला उमेदवार म्हणून कसा चालतो? असा सवालही सेनेनं उपस्थित केला आहे.

You might also like
Comments
Loading...