शिवसेनेने मराठी बाणा दाखवत सत्तेतून बाहेर पडावे – अशोक चव्हाण

स्वाभिमानी असेल तर सरकार मधून बाहेर पडावे

मुंबई: पोटनिवडणुकांच्या निकालानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. राज्यातील लोकसभेच्या दोन जागेसाठी झालेल्या पोनिवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना, भाजप आता कॉंग्रेस पक्ष पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करीत आहे.

दरम्यान, अशोक चव्हाण म्हणाले शिवसेनेने मराठी बाणा दाखवावा. तुम्हाला शिवसेनेची भूमिका पटते का ? असा प्रश्न चव्हाण यांना केला असता. ते म्हणाले “उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतुन बाहेर पडण्याची भूमिका दाखवावी. शिवसेना केवळ टीका करते ठोस भूमिका घेत नाही. तसेच शिवसेना स्वाभिमानी असेल तर सरकार मधून बाहेर पडावे. शिवसेना छत्रपती महाराजांचे नाव घेऊन राजकारण करते मग अवमान कशी सहन करू शकते. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या भाजपवर शिवसेनेची चुप्पी का?” असा प्रश्न अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला.

निवडणूक आयोग संदर्भात बोलताना चव्हाण म्हणाले, कोणाचे समर्थ करण्यासाठी हा प्रयत्न निवडणूक आयोगाने केला हा संशयाचा विषय आहे . भंडारा गोंदियाला वेगळा न्याय तर पालघर मध्ये वेगळा न्याय निवडणूक आयोगाने दिला. आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही दखल घेतली गेली नाही. असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

You might also like
Comments
Loading...