शिवसेनेने स्वतःचा संसार नीट चालतो का ते बघावे – नवाब मलिक

शिवसेनेचा भाजपसोबतचा संसार नीट चालेल की घटस्फोट होणार ?

मुंबई: शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर असभ्य भाषेत टीका केली आहे. पण शिवसेनेचा भाजपसोबतचा मांडलेला संसार धड चालत नाही. अहमदनगरमध्ये ज्यांनी पक्षाचा आदेश पाळला नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईलच, पण शिवसेनेने भाजपासोबतचा संसार कसा नीट चालेल, हे आधी बघावे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

अहमदनगरमध्ये सर्व भाजप विरोधी पक्षांना एकत्र घेत आघाडी करण्यासाठी आमचे प्रयत्न होते . राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. विधनासभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच राष्ट्रवादीने भाजपला पाठींबा दिला होता. त्यामुळे आम्ही सत्तेतून बाहेर पडल्यावर ते भाजपशी आघाडी करण्याची भीती वाटत असल्याचा आरोप पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केला होता. याला प्रत्युत्तर देताना शेलक्या शब्दात मलिक यांनी टीका केली आहे. शिवसेनेचा भाजपसोबतचा संसार नीट चालेल की घटस्फोट होणार, याचंही उत्तर जनतेला हवे आहे, असंही मलिक म्हणालेत.

You might also like
Comments
Loading...