भाजपला खोटे ठरविण्या आगोदर शिवसेनेने विचार करायला हवा : सुधीर मुंनगंटीवार

टीम महाराष्ट्र देशा : भाजपला सत्तेची लालसा आहे. त्यामुळे ते खोट्याचा सहारा घेत आहेत, असे आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहेत. मात्र उद्धव ठाकरे हे आरोप भाजपने फेटाळून लावले आहेत. भाजपचे सत्तेवर नाहीतर सत्यावर प्रेम आहे, असे म्हणत भाजप नेते सुधीर मुंनगंटीवार यांनी शिवसेनेचे आरोप खोडून काढले आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेबाबत भाष्य करताना सुधीर मुंनगंटीवार यांनी सूचक विधान केले आहे. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी मेरे बडे भाई है असे उद्धव ठाकरे म्हणत असले तरीही मोठ्या भावा बाबत मन दूषित करण्याचे काम कोण करते याचा शोध उद्धव ठाकरे यांनी घ्यावा आणि मोठ्या भावाचं लहान भावानं काही गोष्टी ऐकायला हव्यात.

तसेच भाजपला खोटे ठरविण्या आगोदर विचार करायला हवा, जनादेश हा जनतेची सेवा करण्यासाठी होता. मोदीजी अमित शहा यांच्यावर मित्र पक्षांनी कधीही टीका केली नाही. आम्हाला कोणताही खोटारडेपणा करायचा नाही. आम्हाला विकासाचे उन्नतीचे कार्य करायचे आहे. राम मंदिर आमच्यासाठी कायम महत्वाचे असून प्रभू रामचंद्राच्या तत्वारच आम्हाला राज्य करायचे आहे.

दरम्यान राज्यात सत्ता संघर्षाचे सत्र अद्याप सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी माध्यामांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आम्ही सत्ता स्थापनेच्या चर्चेसाठी प्रयत्न करत आहोत. मात्र शिवसेनेने चर्चा थांबवली आहे. तर अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेनेला कोणतही आश्वासन दिलं गेल नव्हत,असे फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तर अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाबाबत भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबर चर्चा झाली आहे, असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.