मुंबई : दसरा मेळाव्यावरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या. अखेर आज तो दिवस येऊन ठेपला आहे.त्यामुळे राज्यातील सर्व जनतेचं लक्ष या दसऱ्या मेळाव्यावर आहे.परंतू यावेळी शिवसेना पक्षाचे दोन मेळावे होणार आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाचा बीकेसी मैदानावर होणार आहे. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा मेळावा शिवाजी पार्कवर. दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. त्यामुळे कोणाच्या मेळाव्याला शिवसैनिक दाद देतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अशातच सामना अग्रलेखातून शिवसेनेकडून दसरा मेळाव्यावरून विरोधकांना लक्ष्य केलं गेलं आहे.
काय म्हटलं आहे सामना अग्रलेखमध्ये ?
याचसंदर्भात शिवसेना पक्षाचे मुखपत्र असेलेल्या सामना अग्रलेखात आजच्या दसरा मेळाव्याबाबत लिहीलं आहे. आज भाजपची पावले त्याच दिशेने पडत आहेत. दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला शिवाजी पार्क म्हणजे बाळासाहेबांचे शिवतीर्थ मिळू नये यासाठी कारस्थाने झाली. शेवटी न्यायालयाने न्याय केला. ज्या शिवाजी पार्कवरून शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाचे, मराठी अस्मितेचे रणशिंग फुंकले, महाराष्ट्र जागा केला, एक बलाढय संघटन उभे केले त्या शिवतीर्थावरच शिवसेनेविरुद्ध मराठी माणसाला लढविण्याचे पाप भाजपच्या कमळाबाईंनी केले. मात्र आता शिवसेनेच्या पुढील लढयाच्या नव्या पर्वाला सुरुवात पुन्हा एकदा शिवाजी पार्कच्याच या रणमैदानावरून होत आहे ही मोठी योगायोगाची गोष्ट आहे. कारण महाराष्ट्राचे भवितव्य जर कुठे निर्माण झाले असेल तर याच रणमैदानावर याच रणक्षेत्रावर संयुक्त महाराष्ट्राचा लढा याच मैदानावर सुरू झाला आणि याच मैदानावर पूर्ण झाला.
भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट झालेला दिसेल
शिवसेनेचे प्रत्येक रणशिंग बाळासाहेबांनी याच मैदानावर फुंकले. आता शिवसेनेच्या नव्या लढय़ाची नांदी याच ठिकाणी होत आहे. आज शिवतीर्थावर विचारांचे सीमोल्लंघन होईल. कोणी कितीही अपशकुन करू द्या, महाराष्ट्रात शिवसेनेचाच भगवा फडकत राहील. आज मुंबईवर शिवसेनेचे राज्य आहे. तुमच्या छाताडावर बसून पुन्हा मुंबई जिंकूच. पुढील निवडणुकीत कमळाबाईची अशी जिरणार आहे की, भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट झालेला दिसेल.
तसेच, पुढच्या पिढीला कळणारदेखील नाही की, भाजप नावाचा एक पक्ष महाराष्ट्रात होता व तो महाराष्ट्राच्या मुळावर आला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सच्चा शिवसैनिक चालत, धावत, मिळेल त्या वाहनाने शिवतीर्थाकडे निघाला आहे. रणमैदान सज्ज होत आहे. ‘खोके वाल्यांचा अधर्म या निष्ठपुढे कसा टिकेल? जेथे धर्म तेथे जया शिवतीर्थाच्या रणमैदानावर धर्म आहे त्यामले जय नक्की आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Jasprit Bumrah । टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर गेल्यानंतर बुमराहनं मौन सोडलं; हृदय जिंकणारा संदेश शेअर केला
- Shivsena । आदित्य ठाकरेंनी सांभाळून बोलावं, आम्ही तोंड उघडलं तर…; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
- Shivsena । दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या शिंदे गटाच्या वाहनांचा अपघात; ८ ते १० गाड्या एकमेकांवर आदळल्या
- Weight Loss Tips | दररोज ‘ही’ योगासने केल्यामुळे होऊ शकते पोटावरील चरबी कमी
- INC । “शिंदे गटाने दसरा मेळाव्याच्या बसेससाठी १० कोटी रुपये कुठून आणले?, ही मनी लाँडरींग तर नाही ना?”; काँग्रेसची मागणी