मेट्रोला शिवसेना स्टाईल दणका, मुंबईत तुफान आंदोलन

blank

टीम महाराष्ट्र देशा : मेट्रो 3 च्या खोदकामांमुळे मुंबईतील नागरिक संतप्त झाले आहेत. प्रकल्पाच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या अवजड वाहनांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी आणि गैरसोय होत असल्याने, दररोजच्या त्रासाला कंटाळून स्थानिक शिवसैनिकांनी सामान्य नागरिकांना घेऊन गिरगाव येथे आज आंदोलन केले. यावेळी आंदोलकांकडून मेट्रोच्या कामाच्या वाहनांवरही दगडफेक करण्यात आली.

गिरगावातील मेट्रो ३ प्रकल्पाच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या अवजड वाहनांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी आणि गैरसोय होत आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बस उशिरा शाळेत पोहोचत असल्याने दररोजचा होणारा त्रास. तसेच रहिवाशांना त्यांच्याच घरी येण्याजाण्यासाठी करावी लागणारी कसरत या संदर्भात शिवसेनेने हे आंदोलन सुरू केले. या आंदोलनात अनेक वाहनांवर दगडफेक करण्यात आली असून एक ट्रक फोडण्यात आला.

दरम्यान मुंबई व पुण्यासारख्या शहरात मेट्रोचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. हे काम नेमके वर्दळीच्या वेळीच चालू असल्याने नागरीकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. जागोजागी रस्त्याचे खोदकाम सुरु असल्याने सकाळी आणि रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणत वाहतूक कोंडी होत आहे. तर हवेत धुलीकण उडत असल्याने वाहन चालकांना वाहन चालवण्यास प्रचंड त्रास होत आहे.

महत्वाच्या बातम्या