fbpx

शिवसेनेनं चक्क ‘गोकुळ’च्या कार्यालयात म्हशी घुसवल्या

shivsena flag

कोल्हापूर : कोणत्याही शेतकऱ्यांना सूचना न देता पशुखाद्याच्या दरात वाढ केल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी यांच्यावतीने शिवसेनेने पशु खाद्य दरवाढ रद्द करावी या मागणीसाठी गायी म्हशींना घेऊन गोकुळ दूध संघाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

यावेळी पशुखाद्य दरवाढ रद्द करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली. शिवाय, गाईच्या दुध दरामध्येही वाढ करण्याची मागणी शिवसेनेनं केली. पशुखाद्याची दरवाढ मागे न घेतल्यास टप्प्या-टप्प्याने जिल्हाभर ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

पशु खाद्याचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्याचे बजेट कोलमडणार असून पशुखाद्यामध्ये 100 रूपये दरवाढ अन्यायकारक असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे. दरम्यान, यावर गोकुळ दूध संघ काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे.