fbpx

महागाईच्या मुद्यावरून शिवसेना आक्रमक

Shivsena

वेब टीम: महागाई आणि पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीविरोधात आज शिवसेनेकडून मुंबईत जोरदार आंदोलन करण्यात आली . मुंबईत ठिकठिकाणी शिवसैनिकांनी निदर्शने केली . आझाद मैदानात शिवसेना नेते अनिल देसाई आणि खासदार अरविंद सावंत निषेध मोर्चात सहभागी झाले होते.
देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले. भाजीपाला महागला, जीवनावश्यक वस्तूंचे दर आवाक्याबाहेर गेल्यामुळे सामान्यांना जगणे कठीण झाले आहे. त्याला कारणीभूत असलेल्या केंद्र सरकारबद्दल देशभरात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. त्यामुळे महागाईचा तीव्र निषेध करत आहोत, असं म्हणत शिवसेनेने आंदोलनाची हाक दिली. ‘नही चाहिये अच्छे दिन; कोई लौटा दे मेरे बीते हुएँ दिन’, ‘नको तो गॅसचा नखरा, बाई आपला चुला बरा’, ‘बहुत हुई पेट्रोल- डिजल के महंगाई की मार, अब उखाड के फेक दो भाजप सरकार’ अशा घोषणा देत शिवसैनिकांनी सरकारविरोधात रोष व्यक्त केला . आदित्य ठाकरेदेखील या आंदोलनात सहभागी झाले होते. निवडणुकीत जे आश्वासन दिले ते पूर्ण केलेच पाहिजे अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली.