यवतमाळ- परळी येथील टिकटॉक गर्ल पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड कुठे आहेत, असा प्रश्नही विरोधक विचारत आहेत. इतके दिवस प्रसिद्धीमाध्यमांपासून दूर राहिलेले संजय राठोड आज (23 फेब्रुवारी) पोहरादेवीचं दर्शन घेणार आहेत.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर ते जनतेसमोर कधी येतात याची प्रतीक्षा सर्वांनाच लागली आहे. त्यांच्याशी संवाद व्हावा, त्यांच्यावर झालेल्या आरोपासंदर्भाने खुलासा व्हावा म्हणून माध्यमाचे प्रतिनिधी अजूनही त्यांच्या निवासस्थानी डेरेदाखल आहेत.
संजय राठोड सहपरिवार मंगळवारी (23 फेब्रुवारी) 11.30 वाजता पोहरादेवीत येतील. ते संत सेवालाल महाराजांचं दर्शन घेतील, संत रामराव बापू आश्रमाला भेट देतील, धर्मपीठावर जाऊन भक्तीधामला भेट देऊन निघून जातील. राठोड माध्यमांशी बोलणार की नाही याबद्दल काही सांगण्यात आलेलं नाही.
राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या पाठिशी शिवसेना पक्षही उभा असल्याचे चित्र आता समोर येत आहे. कारण, पोहरादेवीला जाण्यासाठी निघालेल्या संजय राठोड यांच्या घरी सकाळपासून शिवसेनेचा एकएक नेता दाखल होताना दिसत आहे.
दरम्यान,यामुळे आता बंजारा समाजापाठोपाठ शिवसेना पक्षही संजय राठोड यांच्या पाठिशी उभा असल्याचे दिसत आहे. काही वेळापूर्वीच शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, माजी आमदार विश्वास नांदेकर आणि जिल्हा परिषद सदस्य गजानन बेजंतीवार संजय राठोड यांच्या यवतमाळमधील घरी दाखल झाले.
महत्वाच्या बातम्या
- जालन्यात कोरोनाचे १३७ नवे रुग्ण, नियम मोडणाऱ्यांविरुद्ध पालिकेची कारवाई
- ‘या’ इलेक्ट्रिक कारवर मिळावा तब्बल 1.5 लाखांचा डिस्काऊंट
- विमान प्रवाश्यांसाठी खुशखबर; ३० मिनीटात मुंबई गाठणे शक्य
- खासदार इम्तियाज जलील यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घेण्याचे आवाहन
- शाही विवाह सोहळ्यात कोव्हीड नियम मोडणाऱ्या धनंजय महाडिकांवर अखेर गुन्हा दाखल !