शिवसेना नं. एक चा शत्रू – नारायण राणे

udhhav thakrey and narayan rane

मुंबई: ‘एबीपी माझा’च्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात बोलतांना खासदार नारायण राणे म्हणाले, निवडणुकीत  शिवसेना नं. एक चा शत्रू  असेन. पुढे बोलताना ते असे म्हणाले कि, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती झाली तर मी भाजपमध्ये नसेन असे धक्कादायक विधान राणे यांनी ‘एबीपी माझा’च्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात बोलताना केले.

Loading...

शिवसेना आणि भाजप यांच्या नात्याविषियी त्यांना विचारले असता ते म्हणले ती फक्त तडजोड आहे. ‘तुझ माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना’ अशा म्हणीचा संदर्भ देत त्यांंच्या नात्याचा उलगडा केला. मला भाजपचे हिंदुत्व विचार पटतात आणि मी स्वतः हिंदुत्व विचार सरणीचा आहे म्हणून  भाजपचा विचार केला असे त्यांनी सांगितले.

मी वाईट भाष्य करत नाही, माझी विधिमंडळतील,जाहीरसभेचे भाषणे बघा मी असंविधानिक भाषा बोलत नाही. विचाराने लोकांना जिंकावे, काम, कार्य समाजकार्य करून लोकांना जीकांवे या मताचा मी आहे.  आता जे काही संभाषणे चालू आहेत आरोप प्रत्यारोप हे राजकारणचे पातळी नसल्याच मत त्यांनी व्यक्त केल.  तुम्ही तुमच्या पक्षाचे धोरण सांगा, भूमिका सांगा , तुम्ही केलेले काम सांगा आणि मते मागा. एकमेकांना तुरुंगात  डाबणे हे म्हणतात आम्ही डांबु ते म्हणतात आमची सत्ता आल्यावर आम्ही अजून दहा खोल्या वाढवू या शिवाय लोकांचे किती प्रश्न आहेत?  त्यासाठी यांनी वेळ द्यायला पाहिजे. आणि सत्तारुढ पक्षाने हे नियोजन केले पाहिजे आणि विरोधकांंनी त्याला मदत केली पाहिजे. एकमेकांना शिव्या घालणे म्हणजे विरोधक असे होत नाही असे मत त्यांनी व्यक्त करत चंद्रकांत दादा आणि धनंजय मुंडे यांचे नाव ने घेता त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

एकीकडे शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे भाजपकडून शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न सुरु आहे. आता मध्येच नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधान आलं आले. यावर शिवसेना काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. राणे म्हणाले, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात माझ्या येण्याला शिवसेनेचा आक्षेप होता. माझा मंत्रिमंडळात समावेश झाला तर ते सत्तेतून बाहेर पडणार होते. त्यामुळे शिवसेना-भाजप युती होणार असेल तर माझ्या भाजपमध्ये राहण्याला अर्थ नाही.Loading…


Loading…

Loading...