fbpx

लढाई श्रेयवादाची : उद्धव साहेबांच्या दूरदृष्टीमुळेच मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा : शिवसेना

uddhav thackeray

टीम महाराष्ट्र देशा- मराठा आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून गुरुवारी विधानसभेत मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक मंजूर झाले आहे. मराठा समाजासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला असून हे विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेत कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आले आहे. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असून सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळाले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतूक होत असताना शिवसेनेनं आपल्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचं ट्टविट केलं आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी उद्धव ठाकरेंनी सराकारकडे सातत्याने मागण्या केल्या होत्या. त्यामुळेच मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग सुकर झाल्याचे शिवेसनेनं म्हटलं आहे.

दरम्यान,आघाडी सरकारनं आरक्षणासाठी राणे समिती स्थापन केली होती. या समितीच्या अहवालानंतर तत्कालीन सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं. मात्र ते न्यायालयात टिकू शकलं नाही. मात्र आता मागीसवर्गीय अहवालानं दिलेला अहवाल आणि आधीचा राणे समिताचा अहवाल सारखाच असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला. त्यामुळे हा माझा विजय असल्याचं राणेंनी म्हटलं. सावंतवाडीमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका मांडली.

धर्माच्या आधारे आरक्षण मुस्लिम समाजाला नाहीच : चंद्रकांत पाटील

धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर