कॉंग्रेसच्या दिरंगाईमुळे शिवसेनेची कोंडी !

blank

टीम महाराष्ट्र देशा : दिलेल्या वेळात शिवसेना बहुमत सिद्ध करण्यास अपयशी ठरली आहे. कॉंग्रेसच्या पाठींब्या अभावी शिवसेनेला बहुमत सिद्ध करता आलेले नाही. तर कॉंग्रेसच्या बैठकीत शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत अजूनही अधिकृत संमती मिळालेली नाही. त्यामुळे शिवसेनेला मात्र बॅक फुटवर यावे लागले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सत्ता स्थ्पानेच्या मनसुब्याला काँगेसने सुरुंग लावले असल्याचं बोललं जात आहे.

शिवसेनेला रविवारी राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी निमंत्रित केले होते. तर आज सायंकाळी ७ : ३० वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र शिवसेनेला बहुमत सिद्ध करता आलेले नाही. काँगेसच्या शिवसेनेला पाठींबा देण्याचा निर्णय अद्याप झाला नसल्याने शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा दावा फोल ठरला आहे.

कॉंग्रेस नेत्यांची आज दिल्ली येथे सुमारे ३ : ३० तास बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत चर्चा झाली असली तरी अधिकृत पाठींबा देण्याचे ठरले नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्याशी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं कॉंग्रेस नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

तर शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठींब्याने बहुमत सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दाखवत सरकार स्थापनेचा दावा केला आहे. तर पूर्ण बहुमत सिद्ध करायला अजून वेळ हवा असल्याची मागणी केली आहे. हा दावा राज्यपालांनी ग्राह्य धरला असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. मात्र मुदत वाढ करून देणार नसल्याच राज्यपालांनी स्पष्ट केले आहे.

राज्यपालांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला वेळ होता मात्र कोणताही प्रतिसाद आलेला नाही. त्यामुळे इतर पर्यायी दोन पक्षांचा पाठींबा घेत शिवसेनेने आज सरकार स्थापनेचा दावा केला आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांच्या स्वाक्षरीचं पत्र राज्यपालांकडे सादर केले आहे. मात्र इतर दोन पक्षांना या प्रकियेला वेळ लागत असल्याने शिवसेनेने वेळ वाढवून मागितली आहे. मात्र ही मुदत वाढवून देण्यासाठी राज्यपालांनी नकार दिला आहे.

महत्वाच्या बातम्या