शिवसेनेचे पदाधिकारी दलाली करतात ; नारायण राणे

जमीन अधिग्रहणाला मान्यता का दिली?

मुंबई: ग्रीन रिफायनरीला हा प्रकल्प कोकणात आणण्याचा घाट शिवसेनेने घातला असून सांडपाण्यामुळे मासेमारीचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे. तसेच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांनी जमिनी घेतल्याचा गंभीर आरोप राणेंनी यावेळी केला. कोकण भस्मसात करण्याचा शिवसेनेचा डाव आहे. काही झालं तरी कोकणवासीयांचा ऱ्हास करणारा प्रकल्प मी होऊ देणार नाही असं मत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायन राणे यांनी व्यक्त केलं.

bagdure

राणे पुढे म्हणाले, राज्याचे ‘उद्योगी’ मंत्री आणि केंद्रात अवजड उद्योग मंत्री शिवसेनेचेच आहेत. उद्धव ठाकरेंचा विरोध असेल तर तुमच्या मंत्र्यांनी प्रस्ताव मान्य का केला?, जमीन अधिग्रहणाला मान्यता का दिली? तसेच “विरोध करणाऱ्या अशोक वालम यांना धमक्या दिल्या जात आहेत. सात पिढ्या बसून खाईल इतके पैसे मिळतील, असं पत्र वालम यांना देण्यात आलं. त्यांच्या पत्नीवरही केसेस टाकल्या, छळ केला. वालम यांना ‘मातोश्री’वर बोलवून दम दिला जातो आहे.“,शिवसेनेचे पदाधिकारी दलाली करत आहेत. तसेच १८ गावातील जनतेचा, शेतकऱ्यांचा नाणार ग्रीन रिफायनरीला तीव्र विरोध आहे. त्यामुळे आम्ही नाणार प्रकल्प होऊ देणार नाही. असे नारायण राणे यांनी स्पष्ट केलं.

You might also like
Comments
Loading...