मुंबई : सध्या महाराष्ट्रात आयपीएल २०२२ स्पर्धेची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे यत्र-तत्र-सर्वत्र क्रिकेटचीच हवा आहे. शिवसेना नेते, मुख्य प्रवक्ते, आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावरही क्रिकेटचा फिव्हर चढलेला दिसून आला. राऊत चक्क क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजी करताना दिसले. भारताचा कप्तान रोहित शर्मा जसा पूल शॉट (Pull Shot) खेळतो, अगदी तसाच फटका राऊतांनीही खेळला, त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शिवसंग्राम प्रीमियर क्रिकेट लीग २०२२ला राऊतांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शिरूर लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि फलंदाजीतही हात आजमावला. शिवसेना संपर्कप्रमुख राज्यमंत्री सचिनजी अहिर, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार शरददादा सोनवणे, शिवसेना जिल्हाप्रमुख माऊली (आबा) कटके यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
महाराष्ट्रात सध्या अनेक स्थानिक क्रिकेट स्पर्धा खेळल्या जातात. या क्रिकेट स्पर्धांमधील अनेक खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली या दिग्गज क्रिकेटपटूंना आपले आदर्श मानतात. रोहित शर्मा हा टीम इंडियाचा आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कप्तान आहे. त्याचा पूल शॉट (Pull Shot) जगप्रसिद्ध आहे. अचूक वेळ आणि शक्तीच्या जोरावर रोहित हा फटका खेळून चेंडू सीमारेषेपार करतो, हे आपण कित्येक वेळा पाहिले आहे.
शिवसेनेचे हिटमॅन..! रोहित शर्मासारखा संजय राऊतांनी खेळला Pull Shot; पाहा VIDEO#SanjayRaut #Shivsena #maharashtradesha #RohitSharma @rautsanjay61 @ShivSena @MPShivajirao https://t.co/OwXGmc9Dmj
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) May 7, 2022
राजकारणात शाब्दिक फटकेबाजी करणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी आज यांना फटकेबाजी केली. याप्रसंगी ते म्हणाले, ”राष्ट्रीय स्तरावरील सर्व निवडणुका एकत्र लढविण्यावर महाविकास आघाडीची एकमत झाले आहे. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कामाची नोंद इतिहासात झाली आहे. कोणी काहीही बोलले तरी आढळराव पाटील हे पुढील वेळी खासदार म्हणून संसदेत असतील. लोकसभा निवडणुकीत पराभव होऊनदेखील दुसऱ्याच दिवशी पासून पराभव बाजूला सारून ते जनसेवेच्या कामाला लागले, इथल्या लोकांशी त्यांची नाळ किती घट्ट जुळून आहे हे यावरून दिसून येते.”
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com