fbpx

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात बेळगावात गुन्हा दाखल

sanjay-raut1

बेळगाव: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात निवडणूक आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. बेळगावमध्ये एका सभेदरम्यान शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेतील संजय राऊत यांनी बेळगावचा प्रश्न लोकशाहीने सुटत नसेल तर ठोकशाहीने सोडवू, असे विधान केले होते.

संजय राऊत म्हणाले होते, आम्ही पाकिस्तानला नाही, बेळगावला जाण्याची परवानगी मागत आहोत. बेळगाव महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेवरील बेळगावसंबंधी कोर्टाचा निर्णय येत नाही, तो पर्यंत बेळगाव केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा. बेळगावचा विषय लोकशाही मार्गाने सुटला नाही तर आम्ही ठोकशाहीने प्रश्न सोडवू अशी आक्रमक भाषा राऊत यांनी केली.

सध्या बेळगाव कर्नाटक सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. बेळगावमध्ये बहुसंख्य मराठीभाषिक जनता असून त्यांना महाराष्ट्रात यायचं आहे. कर्नाटक सरकार बेळगावमधील मराठी भाषिकांचा आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. असे विधान केले होते. त्यामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची शंका वर्तविण्यात येत आहे.

1 Comment

Click here to post a comment