मुजफ्फरपूर : उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुजफ्फरपुरमध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनुसार राकेश टिकैत यांची भेट घेतल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी ही राजकीय भेट नसल्याचे सांगितले. “राकेश टिकैत यांची लढाई शेतकऱ्यांसोबत आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. दिल्लीच्या सिमेवर आंदोलन सुरु असतांना मी गेलो होतो. संसदेत देखील आम्ही लढाई लढली आहे. हे सर्वांना माहित आहे. राकेश टिकैत यांची लढाई ही कोणत्या पक्षाची नाही तर सर्वांची लढाई आहे”, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
यावेळी जर ही राजकीय भेट नाही तर दोघांच्या गळ्यात (संजय राऊत, राकेश टिकैत) भगव्या रंगाचा वस्त्र (दुपट्टा) आहे. याचा अर्थ काय, असा प्रश्न संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. यावर संजय राऊत म्हणाले, “तर काय झाले?, हा समाजाचा रंग आहे, देशाचा रंग आहे. तुम्हाला या रंगाशी अडचण आहे का?. तसेच मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवरून आलो आहे. तसेच राकेश टिकैत यांच्या कुटुंबाचे शिवाजी महाराजांच्या कुटुंबाशी एक नाते आहे. सदाशिव राव भाऊ यांचे पत्र टिकैत कुटुंबाला त्यावेळी आले होते.”
यावेळी शिवसेना उत्तर प्रदेशात लढणार का?, यावर संजय राऊत म्हणाले, “५० ते १०० जागा आम्ही पुर्ण उत्तर प्रदेशात लढणार आहोत. तसेच पुर्ण प्रयत्न असतील की उत्तर प्रदेशच्या विधानसभेत शिवसेनेचे आमदार राहतील. तसेच महाराष्ट्रत युतीचे सरकार आहे. जर उत्तर प्रदेशात काँग्रेसची इच्छा असेल तर आम्ही चर्चा करु.”
महत्वाच्या बातम्या :
- “बाळासाहेबांनी उंची व्यवस्थित मोजली होती”, रयत शिक्षण संस्थेच्या वादावरून भातखळकरांचे टीकास्त्र
-
“शरद पवारांच्या अडमुठ्या धोरणामुळे ६७ एसटी कर्मचाऱ्यांचा जीव गेला”, सदावर्तेंचा गंभीर आरोप
-
कोरोनाचा हाहाकार; केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच ७१८ कर्मचारी पॉझिटिव्ह
-
लसीकरणाचं घटतं प्रमाण चिंताजनक; आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता
-
“बाळासाहेबांनी उंची व्यवस्थित मोजली होती”, रयत शिक्षण संस्थेच्या वादावरून भातखळकरांचे टीकास्त्र
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<