शिवसेना खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आमने-सामने

मुलाखतीच्या माध्यमातून व्यासपीठावर वाघ आणि सिंहाची लढाई

मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार आहेत. शिवसेनेत नेहमी टोकाची भूमिका घेणारे तसेच सत्तेत असूनही भाजपवर शाब्दिक प्रहार करणारे राऊत पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबाबाहेर जाऊन मुलाखत घेणार आहेत. ही मुलाखत लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराच्या सोहळ्यात दुपारी चार वाजता पाहायला मिळणार आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक म्हणून खासदार संजय राऊत आक्रमकतेने भाजपाविरोधात तोफ डागत असतात. तसेच अनेक वेळा त्यांनी भाजपला अडचणीत आणले आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपच्या मंत्र्यांकडून शिवसेनेसोबत जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला आहे. या मुलाखतीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलं आहे.

देवेंद्र फडणवीस कधी भाजपला सिंह म्हणून बोलतात तर शिवसेना वाघ त्यामुळे मुलाखतीच्या माध्यमातून व्यासपीठावर वाघ आणि सिंहाची लढाई पाहायला मिळणार का ? अशी चर्चा वर्तविण्यात येत आहे.