शिवसेना खासदार म्हणाले, शिर्डीचे मंदिर चालू करावे ही माझीही भूमिका पण…

shiradi sai baba

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- महाराष्ट्रातले लॉकडाऊन उठले असून देखील तीर्थक्षेत्रे व मंदिरे बंद आहेत. शिर्डी येथील साईबाबांचे मंदिर बंद असल्याने येथील अर्थकारण ठप्प झाले असून व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

शिर्डीचे मंदिर चालू करावे, ही भूमिका माझी देखील आहे. पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्याच्या संदर्भात दक्षता म्हणून मंदिर बंदचा निर्णय घेतला आहे. आता शिर्डीत कोरोना बाधितांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मंदिर चालू करण्याबाबत विनंती करणार आहे, असे वक्तव्य शिर्डीचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केले आहे. खा.लोखंडे यांच्या संपर्क कार्यालयाचे आज लोकार्पण नगरमध्ये झाले. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी खा.लोखंडे म्हणाले की, राज्यातील मंदिरे उघडण्याचा निर्णय न घेतल्यामुळे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असलेले व्यवसाय मागील अनेक महिन्यांपासून बंद असल्यामुळे आर्थिक अडचणीत आले आहेत. शिर्डीचे मंदिर चालू करावे, ही भूमिका माझी देखील आहे. पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्याच्या संदर्भात दक्षता म्हणून मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

आता सर्व राज्यात कोरोना संदर्भात परिस्थिती कमी होत आहे. पण मंदिरे चालू केल्यानंतर पुन्हा कोरोना झपाट्याने वाढू नये, म्हणून राज्याचे मुख्यमंत्री यांनी ही दक्षता घेतली आहे. लवकरात लवकर राज्यातील मंदिरे मुख्यमंत्री सुरू करतील अशी आशा आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान नुकतेच शिर्डीत भाजपच्या अध्यात्मिक समन्वय समितीकडून आंदोलन करण्यात आले होते. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात फलकबाजीही करण्यात आली होती. ‘मंदिरे बंद उघडले बार; उद्धवा धुंद तुझे सरकार’ असा मजकूर या फलकांवर लिहण्यात आला आहे. पण आता शिर्डीत देखील कोरोना प्रादुर्भाव कमी प्रमाणात होत असल्याने तेथील मंदिर चालू करण्याबाबत आम्ही मुख्यमंत्री यांना विनंती करणार आहोत, असेही खा.लोखंडे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-