राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना आक्रमक,सेनेच्या खासदारांची संसद परिसरात घोषणाबाजी

टीम महाराष्ट्र देशा- पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीतील पराभवामुळे शोकसागरात बुडालेल्या भाजपला शिवसेनेने राम मंदिराच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा खिंडीत पकडलं आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शिवसेना आक्रमक झाली असून बुधवारी संसदेबाहेर शिवसेना खासदारांनी राम मंदिराच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून या अधिवेशनात शिवसेना राम मंदिराच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. संसदेबाहेर बुधवारी सकाळी शिवसेना खासदारांनी महात्मा गांधी यांच्या स्मारकाजवळ घोषणा दिल्या. ‘हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार’, असे पत्रक हातात घेऊन शिवसेना खासदारांनी घोषणा दिल्या.

अजित पवारांनी बीडमध्ये येवून दाखवावे, त्यांना जिवंत पेटवू;शिवसेना जिल्हाप्रमुखाची थेट धमकी

रामाला कुणी हायजॅक करु शकत नाही – रावसाहेब दानवे

Loading...