मुंबई : महाराष्ट्राचे राजकीय संकट सुटण्याऐवजी गुंतागुंतीचे होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांनी आता आपली भूमिका कठोर केली आहे. शिंदे यांच्या समर्थकांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती यांना पत्र लिहून शिवसेनेने 2019 मध्ये विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्त केलेले एकनाथ शिंदे या पदावर कायम राहावेत, अशी विनंती केली आहे. भरत गोगावले यांची पक्षाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून ते अजूनही शिवसेनेतच असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यावर आता शिवसेना खासदारांचा देखील एकनाथ शिंदे यांना पाठींबा मिळणार असल्याची चर्चा आहे.
बंडखोर आमदारांवर कुठलीही कारवाई न करता त्यांच्या भावना समजून घ्याव्या, अशी विनंती भावना गवळी यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.
भावना गवळी यांचे पत्र!
मा. ना. उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख
महोदय,
सस्नेह जय महाराष्ट्र!
आपल्या सेवेशी नम्रपणे निवेदन करते की स्थितीत निर्माण झालेल्या परिस्थीतीमुळे आपण व्यतीय झाला आहात. पक्षापुढे अचानकपणे संकट आले आपणासमोर खूप मोठे आव्हाण असल्याची कल्पना मला आहे. एक शिवसैनिक म्हणून मनातही याची खंत आहे.
आपल्या पक्षातील मावळे आमदार हिंदुत्वाच्या मुद्यावर आपणास निर्णय घेण्याकरीता विनंती करीत आहेत. हे सर्व शिवसेनेचे शिलेदार प्रथमतः हाडामासाचे शिवसैनिक आहेत. करीता त्यांच्या भावना समजून आपण त्यांच्यावर कुठलीही कार्यवाही न करता कठीन असला तरी शिवसेनेकरीता निर्णय घ्यावा, हीच संदेशी पुनश्च नम्र दिनती करते
धन्यवाद!
आपली शिवसैनिक
भावना गवळी
महत्वाच्या बातम्या :