शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्याकडे ‘नवीन जबादारी’; वाचा काय आहे बातमी

टीम महाराष्ट्र देशा : केंद्रात आणि राज्यात भाजपासोबतची युती तुटल्यानंतर केंद्रातील मंत्रिपदाचा लगेचंच राजीनामा देणारे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्याकडे राज्यातील उद्धव ठाकरे सरकारने अर्थात महाविकास आघाडी सरकारने मोठी जबाबदारी सोपवली आहे. केंद्राकडे प्रलंबित असलेल्या राज्याच्या विविध प्रस्तावांचा पाठपुरावा करण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समिती या त्रिसदस्यीस समितीची स्थापना केली असून, या समितीचे अध्यक्षपद अरविंद सावंत यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. तसेच या पदाला मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.

केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेल्या राज्याच्या विविध प्रस्तावांबाबत चर्चा करण्यासाठी राज्यातील संसद सदस्यांची २७ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावण्यात आली होती. दरम्यान, या बैठकीत राज्यासंबंधीच्या विविध प्रस्तावांचा वेळोवेळी पाठपुरावा करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आता राज्य सरकारने ‘महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समिती’ या नावाने त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.

Loading...

मुख्यमंत्रिपदावरून वाद झाल्यानंतर शिवसेनेने भाजपासोबतची युती तोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी केंद्र सरकारमध्ये मंत्री असलेल्या अरविंद सावंत यांनी आपल्या मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता.आता सावंतांकडे पुन्हा एकदा नवीन जबाबदारी आली आहे.ही जबाबदारी ते कशी पार पडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
बांगड्यांच्या वादात अमृता फडणवीसांची उडी, आदित्य ठाकरेंवर केला पलटवार
अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
गावितांची 'हीना' होणार 'वळवींची' सून ; खासदार हीना गावितांचा झाला साखरपुडा
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन