ते हॉटेल कमिश्नरच्या मुलाचे: अरविंद सावंत

Fire 2

टीम महाराष्ट्र देशा- मुंबईतील कमला मिल कंपाऊंडमधील आग लागलेले हॉटेल कमिश्नरच्या मुलाचे आहे, असा दावा खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत केला आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

कमला मिल कम्पाऊंडमधील आगीचे पडसाद शुक्रवारी लोकसभेतही उमटले. आगीत ११ महिलांचा मृत्यू झाला. एवढी मोठी दुर्घटना झाली, पण या सर्व मिलमध्ये निवासी आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स झाले. तिथे रेस्तराँ कसे सुरु झाले, त्यांना परवानगी कोणी दिली, असा प्रश्न त्यांनी विचारला. या सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. हॉटेल कमिश्नरच्या मुलाचे आहे, असा आरोप त्यांनी केला असला तरी त्या अधिकाऱ्याचे नाव मात्र त्यांनी जाहीर केले नाही.