अडवाणींच्या अश्रूंची दखल घेतली तर बरे होईल – शिवसेना

नोटाबंदीच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे यंदाचे हिवाळी अधिवेशन अक्षरश: वाया गेले. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी याबद्दल लोकसभेत स्वपक्षीयांना खडे बोलही सुनावले होते.अडवाणींनी लोकशाही व लोकसभेच्या स्थितीवर ढाळलेल्या अश्रूंची दखल घेतली तर बरे होईल , असा सल्ला भाजपला दिला आहे. लालकृष्ण आडवाणी हे काही काँग्रेसचे नेते नाहीत काँग्रेसविरोधी राजकारणाचे ते प्रमुख सेनानी आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.