२५ वर्षांची सत्ता राखण्यात शिवसेना आमदाराला यश

जेऊर ग्रामपंचायतवर पाटील गटाची सत्ता; बागल गटाचा दारूण पराभव

जेऊर: संपूर्ण करमाळा तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या जेऊर ग्रामपंचायच्या पंचवार्षिक निवडणूकीत पारंपारिक पाटील गटाने बागल गटाचा दारूण पराभव केला असून सरपंचपदा सह १५ पैकी १५ जागांवर विजय मिळविला आहे.

दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणूकीची मतमोजणी आज पार पडली करमाळा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींचा समावेश होता परंतु तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या जेऊर ग्रामपंचायत वर सर्व तालुकावासियांचे लक्ष लागून राहिले होते. कारण शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांचे हे गाव असून गेल्या पंचवीस वर्षांपासून जेऊर ग्रामपंचायतवर त्यांची सत्ता आहे.

जेऊर हे १५ हजार लोकसंख्याचे गाव असून जेऊर मध्ये मध्य रेल्वेचे रेल्वे स्टेशन आहे. जेऊर गावाला जवळजवळ ३०-४० गावे जोडली गेलेली असून दळणवळणाचे गाव असून करमाळ्याची राजधानी आणि मोठी बाजारपेठ म्हणून ओळख आहे. १५ सदस्य संख्या असलेल्या जेऊर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होईल असा अंदाज होता परंतु ही निवडणूक पारंपारिक पाटील-बागल गटात दुरंगी लढत झाली.

अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पाटील गटाचे ३ सदस्य बिनविरोध निवडून आले तर उर्वरीत १२ जागांसाठी २६ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उभे होते. प्रभाग क्रमांक ३ मधून सौ जरीन सुल्लेमान मुल्ला, प्रभाग क्रमांक ४ मधून सौ धनश्री उमेश पाथ्रुडकर तर प्रभाग क्रमांक ५ मधून सौ रोहिणी शांताराम सुतार ह्या बिनविरोध निवडून आल्या होत्या.

bagdure

उर्वरीत १२ जागांसाठी २६ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उभे होते परंतु आमदार नारायण पाटील यांनी २५ वर्षांची सत्ता कायम ठेवून १५ पैकी १५ सदस्य तसेच सरपंचपदाचे उमेदवार सौ संगिता साळवे विजयी झाले आहेत. बागल गटाच्या सहा सदस्यांचे डिपोझीट जप्त झाले असून त्यातील ३ सदस्यांना शंभर मते मिळविण्यात पण अपयश आले आहे.

सरपंचपदासाठी तिरंगी लढतीत संगिता साळवे यांची बाजी

प्रथमच जनतेतून सरपंचपदासाठी निवडणूक होत आहे जेऊर ग्रामपंचायतचे सरपंचपद अनुसुचित जमाती महिलांसाठी राखीव असून यासाठी तिरंगी लढत झाली पाटील गटांकडून सौ संगिता भारत साळवे, बागल गटांकडून कु. कोमल विठ्ठल लोंढे तर अपक्ष म्हणून सौ सीमा निकील मोरे निवडणूकीच्या रिंगणात उभ्या होत्या. पाटील गटाच्या साळवे यांनी १९९१ मते घेऊन बागल गटाच्या पुनम लोंढे यांचा ११२१ मतांनी पराभव केला असून लोंढे यांना ८७० मते मिळाली आहेत तर अपक्ष उमेदवार सीमा मोरे यांना ३१० मते मिळाली.

२५ वर्षांची सत्ता कायम

जेऊर ग्रामपंचायतवर १९९२ पासून शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांची सत्ता आहे. ९९२ आणि १९९७ ला ही निवडणूक बिनविरोध झाली होती तर २००२, २००७, आणि २०१२ च्या निवडणूकीत पाटील गटाने एकहाती सत्ता मिळवित हट्रिक साधली होती. यावर्षी ही जेऊर ग्रामपंचायत वर एकहाती सत्ता मिळविली आहे.

बिनविरोध साठी बागल गटाला ऑफर

जेऊर ग्रामपंचायत बिनविरोध व्हावी म्हणून पाटील गटाला सरपंचपद आणि ११ तर बागल गटाला ४ जागा ची आॉफर होती परंतु बागल गटाने ती नाकारून निवडणूक लढविली होती

You might also like
Comments
Loading...