मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमात शिवसेना आमदाराची मुस्कटदाबी

टीम महाराष्ट्र देशा : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.त्या कार्यक्रमाला भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांच्यासह शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार हे उपस्थित होते.मात्र, त्यानंतर कार्यक्रमात शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार यांना बोलू दिले नाही म्हणून चांगलीच चर्चा रंगली होती.

या कार्यक्रमाला महापालिकेकडून आमदार गौतम चाबुकस्वार यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते,त्याबरोबर त्या कार्यक्रमात आमदार चाबुकस्वारांना बोलूही दिले नाही. त्यामुळे हा कार्यक्रम महानगरपालिकेचा होता की भाजपचा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.महापालिकेच्या कार्यक्रमात भाजपच्या आमदारांना बोलू देता,मग मीपण लोकप्रतिनिधी आहे.मला का बोलू दिले गेले नाही.असे करणे चुकीच आहे.या सरकारमध्ये भाजपचे एकट्याचे नसून शिवसेनेचीही आहे असे म्हणत आमदार चाबुस्करांनी आपली नाराजी व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात करण्यात आले होते.या कार्यक्रमात आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांच्या भाषणानंतर त्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र त्यांचे नाव घेतले नाही.त्यावेळी शिवसेना आमदार चाबुकस्वार यांनी मुख्यमंत्र्यांना मला दोन मिनिटे द्या, अशी विनंती केली.मात्र, त्यांना बोलू दिले नाही. मुख्यमंत्री म्हणाले,पुण्यात कार्यक्रमाला जायला उशीर झाला आहे. आपले म्हणणे मला सांगा, मी भाषणात आपल्या प्रश्नावर बोलतो मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात चाबुकस्वारांचा उल्लेख करून शेतक-यांना साडेबारा टक्के परतावा देणे, आणि एमआयडीसीतील प्रलंबित प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले.महापालिकेच्या या कार्यक्रमावर सर्वच विरोधी पक्षनेत्यांनी बहिष्कार टाकला होता.

You might also like
Comments
Loading...