जादूटोणा विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी झाल्यास ‘शिवसेना आमदार – खासदार’चं आत जातील

टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र राज्य सरकार सध्या राज्यभर जादूटोणा विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याच्या प्रयत्नात आहे.या कायद्यासाठी राज्य सरकारने १० कोटी रुपयाची तरतूदही केल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.

भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी एक ट्वीट केले आहे.त्यांनी असे म्हटले आहे की ”ह्या कायद्याची अंमलबजावणी झाल्यास सेना आमदार खासदार आत जातील कारण तेच साले सर्वात मोठे लिंबूबाज आहेत. ह्या समितीने सेनेच्या आमदार खासदारांवर लक्ष ठेवलं तरी महाराष्ट्रात्ली जादूटोणा संपेल. रामदास कदम किव्हा विनायक राऊतला समिती अध्यक्ष करा ह्या दोघांना सारे ठिकाण माहीत आहेत”.
राणे यांनी पुन्हा शिवसेनेला लक्ष केले आहे.तर रामदास कदम आणि विनायक राऊत यांना चांगलेच फैलावर घेतले आहे.

या कायद्याच्या अंमलबजावणी करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे असणार आहेत.तर सहअध्यक्ष श्याम मानव असणार आहेत.

हेही पहा :