आरोग्यमंत्री दीपक सावंत शिवसेनेवर नाराज,पावसाळी अधिवेशनाला मारणार दांडी ?

sawant-deepak

मुंबई : शिवसेना आमदार, आरोग्यमंत्री दीपक सावंत शिवसेनेवर नाराज असल्याची चर्चा आहे. विधानपरिषदेसाठी संधी न मिळाल्यामुळे नाराज झालेले सावंत सहा तारखेनंतर पावसाळी अधिवेशनाला जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दीपक सावंत यांचा पत्ता कट झाल्यानंतर त्यांनी याआधीच मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री आणि पक्षाकडे सोपवला आहे.

शिवसेनेकडून मनिषा कायंदे आणि अनिल परब यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. संधी डावलली गेल्यामुळे दीपक सावंत नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. 27 जुलै 2018 रोजी एकूण 11 विधानपरिषद आमदारांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या चार, काँग्रेसच्या तीन, भाजपच्या दोन, शिवसेना आणि शेकापच्या प्रत्येकी एका आमदाराचा समावेश आहे. 16 जुलैला या जागांसाठी निवडणूक होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 5 जुलैला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून 9 जुलैपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल.

कॉंग्रेसच्या नाराज आमदारांना भाजपमध्ये घेऊन या; येडियुरप्पांचे कार्यकर्त्यांना आदेश

कट्टर काँग्रेसी कार्यकर्त्याला न्याय द्या अन्यथा आमचे राजीनामे घ्या !

शरद पवारांना प्रतिगामी मानत नाहीत- प्रकाश आंबेडकर