मी छातीठोकपणे आव्हान करतो, याचा फैसला आजच्या आज झाला पाहिजे – शिवसेना आमदार

भाजप - शिवसेनेत जुंपली

टीम महाराष्ट्र देशा : पालघर येथील जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सनसनाटी ऑडिओ क्लीप उघड केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लिपची मोडतोड करण्यात आली आहे. मी कार्यकर्त्यांना कुठेही या नीतीचा वापर करण्याचा संदेश दिला नाही. मी बोलल्या वक्तव्यापैकी काहीही चुकीचं बोललो असेल तर माझ्यावर कारवाई करा. मात्र निवडणूक आयोगाने ज्यांनी हि एडीट करून क्लिप वाजवली त्यांच्यावरही कारवाई करा अशी मागणी केली आहे.

दरम्यान, आता यावर शिवसेनेच्या गोटातून प्रतिक्रिया येण्यास सुरवात झाली आहे. शिवसेना आमदार अनिल परब यांनी “मी छातीठोकपणे आव्हान करतो, याचा फैसला आजच्या आज झाला पाहिजे. जर आम्ही दोषी असू तर आम्हाला शिक्षा होईल, मुख्यमंत्री दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे” अशी मागणी केली आहे.

भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदार संघात पोटनिवडणूक होत असून, भाजप आणि शिवसेनेसाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपकडून काँग्रेसमधून आयात केलेले राजेंद्र गावित हे उमेदवार देण्यात आले आहेत. तर शिवसेनेकडून भाजपमधून शिवसेनेमध्ये गेलेले श्रीनिवास वनगा हे उमेदवार आहेत. दरम्यान जसजशी निवडणूक जवळ येत आहे तशी प्रचारातली रंगत वाढत असून, आरोप प्रत्यारोपाचं राजकारण रंगतांना दिसत आहे.

दरम्यान शुक्रवारी याठिकाणी झालेल्या जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सनसनाटी ऑडिओ क्लीप उघड केलीये. या क्लीपच्या सतत्येविषयी अद्याप पडताळणी करण्यात आलेली नाही. मात्र, या क्लीपमुळे शिवसेना आणि भाजपमध्ये वाद निर्माण झाला आहे.

You might also like
Comments
Loading...