शिवसेनेमुळे भाजपाचे १०५ नाही तर भाजपामुळे शिवसेनेचे आमदार-खासदार निवडून आले: नारायण राणे

blank

सिंधुदुर्ग: काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. यात शरद पवारांनी राऊतांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांवर आपल्या शैलीतुन खुलासे केले होते. दरम्यान, आज भाजपा खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत या मुलाखतीवर ‘प्रहार’ केला आहे.

शरद पवार यांनी भाजपाचे १०५ आमदार येण्यामागे, शिवसेनेचं मोठं योगदान आहे असं वक्तव्य केलं होत. तर, या मुलाखतीनंतर भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अनेक राजकीय चिखलफेक सुरु झाल्याचे दिसून येत होते. यावर आता नारायण राणे यांनी देखील टीका केली आहे. राणे म्हणतात, ‘भाजपाचे १०५ आमदार येण्यामागे शिवसेनेचं योगदान नसून सर्वांना माहित आहे २०१४ साली शिवसेनेचे आमदार व खासदार हे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा मुळे आले आहेत, तसेच २०१९ मध्ये देखील शिवसेनेचे खासदार व आमदार भाजपा व नरेंद्र मोदी यांच्याचमुळे आले आहेत.’

आघाडीत बिघाडी : शिवसेनेसमोर लोटांगण घालू नका, कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचा पक्षाला सल्ला

त्यांनी संजय राऊत यांच्यावर अनेक टीका केल्या आहेत. तर शरद पवार यांचा आपण देखील आदर करतो. परंतु, आधी शिवसेनेने ज्या भाषेत पवारांवर टीका केली आहे त्यानुसार तरी यांनी एकत्र येणे चुकीचं असल्याचं ते बोलले. तसेच, फडणवीस यांना सत्तेचा दर्प असल्याचं ते म्हणतात, पण फडणवीस हे सत्तेचा माज असलेले मुख्यमंत्री नसून शांत व सहनशील नेतृत्व असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

हीच आहे का पक्षांतर्गत लोकशाही? निलंबित कॉंग्रेस नेत्याने थोरातांवर डागली तोफ

दरम्यान, त्यांनी सामनातुन शरद पवारांवर केलेल्या अनेक टीका सामनाचे अंक दाखवत सांगितले. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकांचे देखील पुरावे दिले. तसेच, संजय राऊत किती शिवसैनिक आहेत ते सर्वांनाच माहित असून, पूर्वी दिल्लीत देखील ते शिवसेनेच्या पक्षाचे असून शरद पवारांच्याच कार्यालयात जास्त असायचे, अशी खोचक टीका देखील केली आहे.

दुःखाचा डोंगर कोसळलेल्या सगरे कुटुंबाला लोकमंगलने दिला मदतीचा हात