शिवसेना आमदाराला आयकर विभागाचा दणका; आमदारकीही धोक्यात ?

uddhav thackeray

मुंबई : शिवसेनेच्या भायखळा मतदारसंघाच्या आमदार यामिनी जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामधील काही माहितीवर आयकर विभागाने संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे जाधव यांची आमदारकी आता धोक्यात आली असल्याचं दिसून येत आहे. कर्ज प्रकरणातील अनियमितता या मुद्द्यावरुन आयकर विभागाने मनी लाँडरिंगचा प्रश्नही उपस्थित केला आहे.

यामिनी जाधव यांनी 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भायखळा मतदारसंघातून निवडणूक लढवली. यावेळी यामिनी जाधव यांनी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आयकर विभागाला तफावत आढळून आली असल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी आयकर विभागाने केली आहे.

कोलकाता येथे असणाऱ्या शेल कंपनी आणि आमदार जाधव यांचे पती त्यांच्या नातेवाईकांना अवैधरित्या पैसा पुरवत असल्याचं ही आयकर विभागाला आढळून आलं आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने नियमाप्रमाणे प्रतिज्ञापत्राची पडताळणी करण्यास सांगितल्यानंतर आयकर विभागाच्या पाहणीत या बाबी समोर आल्या आहेत. शेल कंपनी असलेल्या प्रधान डिलर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून 1 कोटी रुपये घेतल्याचं आढळून आलं. ही कंपनी एंट्री ऑपरेटरच्या माध्यमातून चालवली जाते, असेही आयकर विभागाच्या तपासणीमध्ये निदर्शनास आले आहे.

महत्वाच्या बातम्या