‘रस्ता बांधला नाही म्हणून शिवसेना आमदार चिखलातचं बसला’

blank

टीम महाराष्ट्र देशा : शिवसनेचे आमदार तुकाराम काते यांनी MMRDA च्या विरोधात चिखलात बसून ठिय्या आंदोलन केले आहे. रस्ता बांधण्याचे आश्वासन न पाळल्याने त्यांनी आंदोलनाचे शस्त्र उचलले आहे. त्यांच्या आंदोलनाला नागरिकांनी ही मोठ्या प्रमाणात पाठींबा दिला आहे.

या आंदोलनाविषयी बोलताना तुकाराम काते यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना ‘मुंबईतील मानखुर्दमधील महाराष्ट्र नगर या ठिकाणी १०० एकर परिसरात मेट्रो कारशेड उभारले आहे. मात्र या कारशेडला महाराष्ट्र नगरच्या रहिवाश्यांनी सुरुवातीपासून विरोध केला होता अशी माहिती दिली परंतु सुरुवातीला गटाराची लाईन आणि रस्ता व्यवस्थित बांधून द्या त्यानंतर मेट्रो कारशेडचे काम सुरु करा असा पावित्रा या ठिकाणच्या स्थानिकांनी घेतला होता.

त्यावेळी एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी रस्त्याचे व इतर काम लवकरात लवकर पूर्ण करुन देऊ असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र अद्याप MMRDA प्रशासनाने हा रस्ता बनवलेला नाही. त्यामुळे तुकाराम काते यांनी MMRDA च्या विरोधात चिखलात बसून ठिय्या आंदोलन केले आहे.

दरम्यान, या रस्त्याच्या कामासाठी कामाच्या ठिकाणी मुरूम टाकण्यात आला होता. परंतु सततच्या पावसामुळे तिथे आता चिखल तयार झाला आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. त्याचाच निषेध म्हणून तुकाराम काते यांनी हे आंदोलन केले आहे.