मुंबई : शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटातील संघर्ष संपण्याचे नाव घेत नाहीये. आदित्य ठाकरे सध्या शिवसंवाद यात्रा काढून राज्याच्या दौऱ्यावर आहेत. शिंदे गटाविरोधात आदित्य ठाकरे आक्रमक झाले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना तसेच शिंदे यांच्यातील वाद आता तीव्र होत आहेत. शिवसेना नेत्या दीपाली सय्यद शिवसेना आणि शिंदे गट एकत्र येण्यासाठी आवाहन करत आहेत. दीपाली सय्यद यांनी ट्वीट करत शिवसेना आमदार आणि खासदारांना सल्ला दिला आहे. शिवसेना आमदार खासदारांनी रशिया- युक्रेन युद्धाकडून शिकावे, असे त्या म्हणाल्या.
काल (गुरुवार) देखील त्यांनी ट्वीट केले होते. “दोन्ही बाजूच्या आमदार खासदारांनी प्रयत्न केले तर अशक्य काहीच नाही, वेळेच्या आगोदर आणि वेळेच्या नंतर काहीच नाही जे आहे ते वेळेवर, अजुनही वेळ गेलेली नाही, राग रूसवे विसरून कुटुंब वाचवा! चर्चा झालीच पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान, आज पुन्हा (शुक्रवार) दीपाली सय्यद यांनी ट्वीट करत शिवसेना आमदार आणि खासदारांना सल्ला दिला आहे. “शिवसेना आमदार खासदारांनी रशिया- युक्रेन युद्धाकडून शिकावे, तसेच न्यायालयाच्या निकालात एक हारतो तर एक जिंकतो. पण वेळ अजून गेलेली नाही. शिवसेना जिंकू शकते. फक्त विषय चर्चेने संपवा. शिवसेना एक कुटुंब आहे. त्याचे विभाजन होऊ देऊ नका,” असे दीपाली सय्यद म्हणाल्या.
@ShivSena
@OfficeofUT
@mieknathshinde pic.twitter.com/1Qkrt44ooc— Deepali Sayed (@deepalisayed) July 22, 2022
संजय राऊत, शांतता घ्या-
यापूर्वी दिपाली सय्यद यांनी संजय राऊत यांना संयमाचा सल्ला दिला आहे. राऊत त्याचं काम करत आहेत. ते भाजपलाही त्याच पद्धतीने बोलायचे. त्यांची ती शैली आहे. ते बिनधास्त बोलत असतात. त्यामागे त्यांचा हेतू फक्त शिवसेनेला सपोर्ट करायचा असतो. पण संजय राऊतांनीही शांतता घ्यावी आणि त्यांनीच पुढाकार घेऊन दोन्ही नेत्यांना एकत्रित आणावं, असं आवाहन दिपाली सय्यद यांनी केलं होतं.
तसेच पत्रकार परिषदेत बोलताना सय्यद म्हणाल्या होत्या, “शिवसेनेतील दोन्ही गटांना पुन्हा एकत्र यायचंय, पण कुठेतरी मान, अपमान, अहंकार या गोष्टी मध्ये येतात. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची येत्या दोन दिवसात भेट होणार असल्याचा दावाही सय्यद यांनी केला होता.
महत्वाच्या बातम्या :
- Alcohol addiction | मद्य शौकिनांनो सावधान!; दारूमुळे तरुणांवर होणारे ‘हे’ दुष्परिणाम वाचा
- Dr.Bharti Pawar। द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती पदावर निवड झाली हा आमच्यासाठी सोनेरी क्षण – भारती पवार
- Amruta Fadnavis | “जिलेबी कितीही आडवळणी असो…; अमृता फडणवीस यांच्या देवेंद्र यांना अनोख्या शुभेच्छा
- Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंनी सुहास कांदेंचं चॅलेंज स्वीकारलं, म्हणाले…
- Suhas Kande : आदित्य ठाकरेंनी माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली तर मी ताबडतोब राजीनामा देतो; सुहास कांदे यांचे आव्हान
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<