वाहतुक कोंडीला वैतागून शिवसेना आमदाराने केली अवैध रिक्षाची तोडफोड

पुणे : वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरलेले शिवसेना आमदार सुरेश गोरे यांनी अवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षाची तोडफोडी केल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री चाकणमध्ये ही घटना घडली. दरम्यान, रिक्षाची तोडफोड केल्याने आमदार गोरे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील भाजप नगरसेवकाने केली आरटीआय कार्यकर्त्याला मारहाण; पोलिसांत गुन्हा दाखल

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर तसेच आसपासच्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे, पुणे – नाशिक रोडवर असणाऱ्या चाकणमध्ये देखील वाहतूकीचा खोळंबा होत आहे. रविवारी रात्री आमदार गोरे यांना देखील वाहतूक कोंडीला समोर जावं लागलं. त्यामुळे गोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.

पुण्यामध्ये पुन्हा एकदा गुंडाचा हैदोस; 16 गाड्यांच्या काचा फोडल्या

बराच वेळ होऊनही काही केल्या वाहतूक सुरळीत होत नव्हती, त्यामुळे संतावलेल्या आ. गोरे आणि त्यांच्या 10 ते 11 कार्यर्त्यांनी आपला मोर्चा थेट अवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षाकडे वळवला, आता आमदारच रस्त्यावर उतरल्याच पाहून रिक्षा चालकांनी तेथून पोबारा केला. दरम्यान, काल एका रिक्षावाल्यांने पुढे येत सुरेश गोरे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.

धक्कादायक : मुलाशी फोनवर बोलली म्हणून पित्याने कुऱ्हाडीने तोडली

You might also like
Comments
Loading...