मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेशी बंड केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाला प्रचंड वेग आला आहे. शिवसेनेला गळतीचे जणू ग्रहणच लागल्याचे दिसून येत आहे. अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे. कालपर्यंत शिवसेनेत असलेले शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) नॉट रिचेबल दाखवत आहेत. त्यांचा फोन लागत नसल्याने अनेक चर्चांना उधान येत आहे. इतर आमदारांप्रमाणे भास्कर जाधवही ‘शिंदे’ सेनेत सहभागी तर नाही झाले ना? अशा चर्चा आता रंगत आहेत.
दरम्यान सेनेशी बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे ४९ आमदारांचे पाठबळ आहे तर शिवसेनेकडे १५ मात्र आता भास्कर जाधवही नॉट रिचेबल असल्यामुळे ही संख्या कमी होऊ शकते. या राजकीय घडामोडींचा महाविकास आघाडीवर परिणाम होत आहे. मविआ सरकार डगमगीत होताना दिसून येत आहे.
काल (२३ जून) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला. माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले कि, “राज्याचे मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आमचा खंबीर पाठिंबा आहे. शेवटपर्यंत संघर्ष करत राहू. सरकार टिकण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत. मी दुपारी मुख्यमंत्र्यांशी बोललो, आताही बोललो. यापेक्षा दुसरी कोणतीही भूमिका राष्ट्रवादीची नाही. ही आमची अधिकृत भूमिका असेल. प्रसारमाध्यमांनी इतर कोणत्याही वृत्तावर विश्वास ठेवू नये. शिवसेनेबाबत जे काही निर्माण झालं आहे ते त्यांचे प्रवक्ते सांगतील.”
महत्वाच्या बातम्या:
- Eknath Shinde vs Arvind Sawant : धमक्यांना भीक घालत नाही, तुमच्यावरच कारवाई करू; एकनाथ शिंदेंचा सावंतांना इशारा
- Eknath Shinde vs Arvind Sawant : धमक्यांना भीक घालत नाही, आम्हीच बाळासाहेबांची खरी शिवसेना – एकनाथ शिंदे
- Narayan Rane on Sharad Pawar : “त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास…” ; नारायण राणेंचा शरद पवारांना गंभीर इशारा
- Sharad Pawar PC : सरकार आपले बहुमत सिद्ध करेल ; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास
- Praful Patel: महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंसोबत आहे – प्रफुल्ल पटेल