शिवसेनेचे मंत्री अनिल परब आणखीन अडचणीत, पर्यटन मंत्रालयाकडून चौकशीचे आदेश

मुंबई : शिवसेनेचे नेते तथा परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने त्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात समुद्र किनारी बेकायदा जमिन खरेदीप्रकरणी अनिल परब यांची चैाकशी होणार आहे. समुद्र किनारपट्टीचे नियम न पाळता त्यांनी ही जमिन खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

भारतीय जनता पक्षाचे खासदार गोपाळ शेट्टी, गिरीश बापट आणि मनोज कोटक यांनी याबाबतची तक्रार केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली होती. त्यानंतर मंत्रालयाने परब यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

काय आहे प्रकार?
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनूसार, दापोली जवळील मुरुड समुद्र किनाऱ्यावर लॉकडाऊनच्या काळात म्हणजेच २०२० मध्ये अनिल परब यांनी आलिशान साई रिसॉर्ट बांधले. जून २०१९ मध्ये अनिल परब यांनी जमीन घेतली. मात्र, सात बारा नावावर केलेला नाही आहे. तसंच २०२० मध्ये ठाकरे सरकारच्या अधिकारांचा दुरुपयोग करुन सगळे नियम धाब्यावर बसवून समुद्र किनाऱ्यावर, CRZ मध्ये आलिशान रिसॉर्ट बांधला. रिसॉर्ट बांधून झाल्यावर अनिल परब यांनी ते रिसॉर्ट २९ फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यांचे भागीदार आणि शिवसेना नेते सदानंद कदम यांच्या नावावर केला, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.

भ्रष्टाचाराचे आणखीन एक प्रकरण
गजेंद्र पाटील यांनी या महावसुली विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पाटील हे नाशिक परिवहन विभागात मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत होते. पाटील यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन पंचवटी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या उपायुक्तांना दिले आहेत. पाटील यांनी परिवहन विभागात बदल्यांचं रॅकेट कसं चालतं याचा पर्दाफाश आपल्या तक्रारीत केला आहे. उपपरिवहन अधिकारी बजरंग खरमाटे हे बदल्या मॅनेज करत असून अर्थपूर्ण व्यवहार करत आहेत. त्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांचं अभय आहे, असा दावा पाटील यांनी तक्रारीत केला आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP