‘शिवसेना म्हणजे पॉवर; नरेंद्र मोदीसुद्धा समोरुन जाताना माझी विचारपूस करतात’

‘शिवसेना म्हणजे पॉवर; नरेंद्र मोदीसुद्धा समोरुन जाताना माझी विचारपूस करतात’

sanjay raut vs narendra modi

अहमदनगर : शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी आज अहमदनगर येथील एका कार्यक्रमास हजेरी लावली. यावेळी भाषण करताना त्यांनी तुफान टोलेबाजी करत विरोधकांना लक्ष्य केलं. शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना त्यांनी केलेल्या रोखठोक वक्तव्यांमुळे त्यांनी चांगल्याच टाळ्या मिळवल्या.

‘चांगलं काम वेळीच होण्यासाठी, प्रश्न मार्गी लावण्यासाठी सत्ता असल्याने आम्ही अधिकाऱ्यांना दम देवू शकतो. गडचिरोलीला पाठवू का असा दम देवू शकतो. सत्ता असो वा नसो शिवसेना स्टाईलने अधिकाऱ्यांकडून कामे करून घ्या,’ असं त्यांनी नेत्यांसह शिवसैनिकांना बजावून सांगितलं. तर, ‘शिवसेना म्हणजे पॉवर, सत्ता. पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा समोरुन जाताना माझी विचारपूस करतात. मोदी म्हणतात कैसे हो भाई? याला सत्ता म्हणतात. गुजराती देखील सामना पेपर घेतात,’ असं संजय राऊत म्हणाले. यावर उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला.

यासोबतच, ‘शिवसेनेत माज असायलाच हवा. कोणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल. वाघा सारखे जन्माला आलो, वाघासारखे मरणार,’ असं देखील संजय राऊत म्हणाले. आमदार आणि खासदार माजी होतो. पण शिवसैनिक कधीच माजी होत नाही. संसदेत अनेक खासदार येतात. बऱ्याच खासदारांना कोणी ओळखतही नाहीत. पण शिवसेनेच्या खासदारांना ओळखले जाते. शिवसैनिक म्हणून ही ओळख आहे. पक्ष सोडून गेला तरी त्याची ओळख शिवसैनिक हीच राहते. हा नारायण राणे… तो आमका असं म्हणत नाही. तो शिवसैनिक आहे, असंच म्हटलं जातं,’ असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या