शिवसेनेच्या महापौरांची जीभ घसरली अन् म्हणाल्या नारायण राणे अंगार है…

शिवसेनेच्या महापौरांची जीभ घसरली अन् म्हणाल्या नारायण राणे अंगार है…

नारायण राणे

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंना रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलने झाली. अनेक ठिकाणी राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. शिवसैनिकांकडून भाजपच्या कार्यालयात कोंबड्या सोडण्यात आल्या. मात्र, ठाण्यात राणेंविरोधात आंदोलना दरम्यानचा वेगळाच प्रकार आता समोर योत आहे.

महापौर नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत नौपाडा पोलीस ठाण्याच्या बाहेर नारायण राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी देत त्यांना अटक करण्याची मागणीही करण्यात आली. परंतु या घोषणाबाजी सुरु असतानाच शिवसेनेच्या महापौरांची जीभ घसरली आणि ते नारायण राणो अंगार है.. बाकी सब भंगार है.. अशी घोषणा देण्यात आली. तोच व्हिडीओ सोशल मीडियावर भाजपने वायरल करीत महापौरांनी देखील राणे यांचे अस्तिव मान्य केले, अशी टीका भाजपकडून करण्यात येत आहे.

महापौर म्हस्के यांनी ती घोषणा केल्याचे वायरल झालेल्या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. मात्र ही घोषणा होत असतानाच काही शिवसैनिकांना महापौरांच्या या घोषणेने बुचकुळ्यात पाडल्याचेही दिसून आले. त्यामुळे त्यावर नेमके काय बोलायचे असा पेच काही पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत आहेत. शिवसेनेचे नाशिकमधील शहाराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी नारायण राणेंविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या