… म्हणून राष्ट्र्मंचाच्या आजच्या बैठकीला शिवसेना नेते उपस्थित राहणार नाहीत

राष्ट्रामंच

मुंबई – भारतीय जनता पक्षाची घोडदौड रोखण्यासाठी विरोधकांच्या तिसऱ्या आघाडीची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. आज सायंकाळी ४.०० वाजता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी ‘राष्ट्र मंच’च्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय.

काल पवारांनी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतली. या भेटीनंतर भाजप विरोधात सक्षम विरोधी आघाडी निर्माण करण्यासाठी शरद पवार यांनी हालचाली सुरु केल्या असून ते इतर राज्यातील भाजप विरोधी प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्याची रणनीती आखत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

या बैठकीत राजकीय नेत्यांव्यतिरिक्त वेगवेगळ्या क्षेत्रातील इतर काही प्रसिद्ध व्यक्तींनाही आमंत्रित करण्यात आलंय. दुसरीकडे या बैठकीत कॉंग्रेसचा एकही नेता सहभागी होणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे ‘राष्ट्र मंच’च्या छत्राखाली होत असलेली ही बैठक कॉंग्रेसला वगळून तिसऱ्या आघाडीची चाचपणी असल्याचे बोलले जात आहे.

देशातील अनेक महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मात्र, या बैठकीत शिवसेनेचा सहभाग नसल्यामुळं भुवया उंचावल्या आहेत. मात्र या बैठकीला राष्ट्र्मंचाशी संबंधित व्यक्तींनाच बोलावण्यात आल्याचं सांगितले जात आहे.

शरद पवार आज दिल्लीत राष्ट्रमंचच्या सदस्यांसोबत बैठक घेत आहेत. ते देशाचे मोठे नेते आहेत आणि देशातील नेते विविधं विषयांसंदर्भात त्यांची भेट घेत असतात यात राजकीय, आर्थिक विषयांवर चर्चा होत असते. आजची बैठक सर्वपक्षीय विरोधकांची बैठक नाही. यात सपा, बसपा, वायएसआरसीपी, टीडीपी आणि टीआरएस देखील या बैठकीला उपस्थित नाहीत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आजच्या बैठकीला कोण उपस्थित राहणार ?

यशवंत सिन्हा यांच्यासह पवन वर्मा, संजय सिंह, डी. राजा, फारूख अब्दुल्ला, न्या. ए. पी. सिंह, जावेद अख्तर, केटीएस तुलसी, करण थापर, आशुतोष, अॅड. माजिद मेमन, खासदार वंदना चव्हाण, माजी निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी, के. सी. सिंग, संजय झा, सुधींद्र कुलकर्णी, अर्थतज्ज्ञ अरुण कुमार, कॉलिन गोन्सालवीस, घनश्याम तिवारी, प्रितीश नंदी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

IMP