fbpx

शिवसेना नेते सुरेश कालगुडे यांचा अपघाती मृत्यू, शिवसैनिकांकडून घातपाताचा संशय

रायगड : शिवसेना नेते तथा जि.प. माजी विरोधी पक्षनेते सूर्यकांत उर्फ सुरेश कालगुडे यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. महाड एमआयडीसी परिसरात रात्री दोनच्या सुमारास ट्रेलरने धडक दिल्याने सुरेश कलगुडे यांचा जागीच मृत्यू झाल्याची महिती मिळते आहे.मात्र त्यांचा अपघाती मृत्यू नसून हत्या करण्यात आली असल्याचा संशय शिवसैन्निकांनी व्यक्त केला आहे. घटनेचा अधिक तपास महाड औद्योगिक वसाहत पोलीस करीत आहेत.

दरम्यान, शिवसैनिकांमध्ये संतापाची भावना पसरली असून तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे  पोलिसांनी झुआरी कंपनीबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.या संपूर्ण प्रकरणाबद्दल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी कालगुडे यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदानासाठी पाठवण्यात आला आहे. त्यानुसार आता पोलीस तपास करणार आहेत.