सरकार व्यवस्थित चालू असताना घोडेबाजार करण्याची गरज का वाटते?संजय राऊत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा साधला भाजपवर निशाना

टीम महाराष्ट्र देशा – ‘सरकार व्यवस्थित चालू असताना घोडेबाजार करण्याची गरज का वाटते?असा रोकठोक सवाल विचारात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाना साधलाय. अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीचे पैसे जमा झालेले नसून कर्जमुक्तीसाठी सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत, तर त्याचवेळी भाजपच्या तिजोरीत मात्र पैसे आहेत. ते सरकार चालवण्यापेक्षा इतर पक्षांचे आमदार आणि खासदार फोडण्यासाठी कसब पणला लावत असून त्यामुळे महाराष्ट्र २० वर्षे मागे जातोय असे वाटते,’ अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.