शिवसेना नेत्याने उधळली शरद पवारांवर स्तुतिसुमने !

टीम महाराष्ट्र देशा : शरद पवार हे सहकार चळवळीचे आधारस्तंभ आहेत, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहे. तसेच, सहकार चळवळीसाठी पवारांसारख्या नेत्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. मुंबईत डेक्कन मर्चंट को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या शतकपूर्ती सोहळ्यात ते बोलत होते.

आर्थिक अडचणीत आलेल्या सिटी बँकेचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी केंद्र सरकारच्या सहकार धोरणावर नाराजी व्यक्त केली. सहकारी बँकाबाबत अर्थमंत्री अरुण जेटली काम करतो करतो म्हणतात, पण प्रत्यक्षात होत नाही. आम्ही सत्तेत असून सत्तेत नसल्यासारखं वाटते, आता तर आम्ही निवडणूक विरोधात लढवायचे ठरविले आहे, असे खासदार अडसूळ यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, आता दिवस थोडे वेगळे आहेत. सहकाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होताना दिसतो आहे. चार-पाच लोकांची चूक होते, पण त्याची किंमत सर्व लोकांना भोगावी लागते. अशा परिस्थितीत सरकारने मात्र पाठीशी राहिले पाहिजे.”, असे शरद पवारांनी सहकारी बँकांबाबत बोलताना म्हटले. मुंबईत डेक्कन मर्चंट को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या शतकपूर्ती सोहळ्यात शरद पवार आणि आनंदराव अडसूळ एकाच मंचावर उपस्थित होते.

You might also like
Comments
Loading...