fbpx

माजी उपशाखाप्रमुखाची हत्या; शिवसैनिकांवर हल्ल्याचे सत्र सुरूच

shiv-sena-leader-murdered-in-mumbai

मुंबई : शिवसेना कार्यकर्त्यांवर हत्येचे सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी अहमदनगरमध्ये शिवसैनिकाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर शहापूर तालुक्यातील अघई येथील शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या करण्यात आली.

आता पुन्हा एकदा शिवसेनेचे मुंबईतील मालाडमध्ये शिवसेना नेत्याची हत्या झाली आहे. मालाडमधील माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची अज्ञातांनी गोळीबार करुन हत्या केली.सावंत हे शिवसेनेच्या मालाडमधील शाखा क्रमांक 39 चे माजी उपशाखाप्रमुख होते. त्यांच्यावर अज्ञातांनी तीन राऊंड गोळीबार करून त्यांची हत्या केली.

गोळीबारानंतर महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी सचिन सावंत यांना मृत घोषित केले.

 

संबंधित बातम्या :

शिवसैनिकांवर हल्ल्याचे सत्र सुरूच; शिवसेना उप-तालुकाप्रमुखावर हल्ला

 

शिवसैनिक हत्याकांड: तर हजारो शिवसैनिक करणार वर्षावर ठिय्या आंदोलन

 

अहमदनगर दुहेरी हत्याकांड : नगरमध्ये कडकडीत बंद शिवसेना नेते नगरमध्ये दाखल

 

उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक करण्याचा आरोप असलेल्या निलेश लंके यांची शिवसेनेतून हकालपट्टी

 

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ