जळगाव : बोदवड नगरपंचायत निवडणुकीत भाजपने बाजी मारली. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या गटाची सत्ता थोडक्यात हुकली. त्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या निवडणुकीवरूनच एकनाथ खडसे यांनी भाजप-सेनाची छुपी युती असल्याचे म्हटले होते. तर निवडणुकीपूर्वी भाजप नेते गिरीश महाजन आणि जळगावचे पालकमंत्री शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या भेटीच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. त्यांनी जामनेर येथे एकाच गाडीत बसून चर्चा केली होती.
दरम्यान काल (२६ जानेवारी) पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांनी जामनेरमधील कार्यक्रम संपताच थेट गिरीश महाजन यांच्या घरी हजेरी लावली. याठिकाणी गुलाबराव पाटील यांचा भाजप कार्यकर्त्यांकडून सत्कारही करण्यात आला. त्यामुळे एकनाथ खडसे यांचा आरोप आणि गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांची भेट यात ताळमेळ असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे.
एकनाथ खडसे काय म्हणाले होते?
बोदवड नगरपंचायतीबाबत एकनाथ खडसे यांनी म्हटले होते की,’एक जागा ईश्वरचिठ्ठीने आणि एक जागा सहा मतांनी गमावली आहे. पण शेवटी पराभव तर पराभवच आहे. भाजपा आणि शिवसेनेची छुपी युती (BJP-Shiv Sena alliance) होती. गिरीश महाजन आणि शिवसेनेच्या स्थानिक आमदारांमध्ये तीन दिवसांपूर्वी चर्चा झाली. पेपरमध्ये फोटोही आले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचा पराभव करा या हेतूने सर्व पक्ष एकत्र आले’ तर यावरच गिरीश महाजन (BJP leader Girish Mahajan) यांनीही प्रतिक्रिया देत टोला लगावला.
गिरीश महाजन यांचे प्रत्युत्तर-
“बोदवड नगरपंचायतीसंबंधी (Bodwad Nagar Panchayat) एकनाथ खडसे यांना काय म्हणायचे आहे ते म्हणू द्या. विधानसभेत खडसे पडले; खरं तर ते मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत होते. बोदवडमध्ये हारले तर आता कारणं कशाला सांगत आहात. मोठ्या मनाने सांगाना आम्ही हरलो. ज्याच्यात दम आहे तो निवडून येतो. मुक्ताईनगरमध्ये त्यांचे सरकार नाही, त्यामुळे काही कारणं सांगायची आणि आपली पुंगी वाजवायची असा प्रकार खडसे करत आहे.” असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “ज्याच्यात दम असतो तो निवडून येतो”, नगरपंचायत निवडणुकीवरून गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर टीका
- …त्या कार्यक्रमातील ६३ सहभागींपैकी मी एक होतो- किरीट सोमय्या
- मुंबईत टिपू सुलतानच्या नावाने भाजपचा राडा; जाणून घ्या काय आहे प्रकरण
- विराटचे यश कोणाला पचले नाही? हरभजनचा रवी शास्त्रींना सवाल
- अभिनेता चिरंजीवीला कोरोनाची लागण