मुंबई : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या काही याचिकांवर आज सुनावणी पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने वकील कपिल सिब्बल तर दुसरीकडे शिंदे गटाच्या वतीने वकील हरीश साळवे यांनी जोरदार युक्तिवाद केला. या प्रकरणी पुढील सुनावणी १ ऑगस्टला होणार आहे. तसेच हे प्रकरण मोठ्या खंडपीठात जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. यावर शिवसेना नेते अनिल देसाई प्रतिक्रिया आली आहे.
शिवसेना नेते अनिल देसाई एका वृत्तवाहीणीशी बोलत होते. यावेळी त्यांनी भूमिका स्पष्ट केली. देसाई म्हणाले, “सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. कोर्टाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर नोंदवलेले निरीक्षण महत्वाचे आहे. आम्हाला अनेक गोष्टी लिखीत स्वरुपात द्याव्या लागणार आहेत. महत्वाचं म्हणजे, अपात्रतेवर सुप्रीम कोर्टचं निर्णय घेईल.”
न्यायालयात काय घडले?-
महाराष्ट्रातील राजकीय संकट अद्याप संपलेले नाही. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने वकील कपिल सिब्बल आणि शिंदे गटाच्या वतीने वकील हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला. भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांनी या प्रकरणाची सुनावणी मोठ्या खंडपीठामार्फत केली जाऊ शकते, असे संकेत दिले आहेत.
सीजेआय म्हणाले की आम्ही हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्याचे आदेश देत नाहीत. फक्त आमचा विचार आहे. आता या प्रकरणाची सुनावणी १ ऑगस्टला होणार आहे. यासोबतच सर्व पक्षांकडून प्रतिज्ञापत्रेही मागविण्यात आली आहेत. कोणते मुद्दे ऐकून घ्यायचे आहेत, हे दोन्ही पक्षांना लिखित स्वरूपात द्यावे लागेल. कोर्टाने विधानसभेचे रेकॉर्ड जपण्यास सांगितले आहे.
गटनेता हटवण्यावरूनही मोठा वाद-
गटनेता पदावरुन शिवसेना आणि शिंदे गटात मोठा वाद सुरु आहे. कोर्टाने याबबात महत्वाचे निरीक्षण नोंदवले. गटनेता बदलणं हा पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचे मत न्यायालयाने म्हटले आहे. एकनाश शिंदे यांनी बंड केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ठाकरेंनी पावलं उचलत शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवले होते. तसेच त्या ठिकाणी अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली होती.
मात्र एखाद्या गटाला आपला नेता बदलावा वाटत असेल तर त्यात गैर काय असा युक्तिवाद हरीश साळवे यांनी केला? मात्र कुठेतरी दूर बसून मी नेता आहे सांगणं हे कुठल्या तत्वात बसत, असा युक्तिवाद ठाकरेंची बाजू मांडणारे वकील कपिल सिब्बल यांनी केला.
महत्वाच्या बातम्या :
- S Sreesanth : “विराटच्या टीममध्ये असतो तर भारत…”, भारताचा माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य!
- Devendra Fadnavis | सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले, “आमची केस…”
- Sanjay Raut। खासदार कोणत्या मजबुरीतून सोडून गेले हे आम्हाला माहिती आहे, यामध्ये राजकारण अजिबात नाही : संजय राऊत
- Eknath shinde vs shiv sena : पक्ष सोडला नाही तर पक्षांतरबंदी कायदा कसा लागू होणार?; हरीश साळवेंचा सवाल
- Ravi Rana : “आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला”, संजय पांडेंच्या अटकेनंतर रवी राणांचे वक्तव्य
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<