गोव्यामध्ये शिवसेनेला जबर धक्का

shiv sena

पणजी: शिवसेनेला गोव्यामध्ये जोरदार धक्का बसला आहे. शिवसेनेचे माजी राज्यप्रमुख शिवप्रसाद जोशी यांच्यासह विविध ठिकाणच्या २४ पदाधिका-यांनी शनिवारी पक्षाचा सामूहिक राजीनामा दिला आहे.

गोव्यामध्ये शिवसेनेला धक्का बसला आहे. खासदार संजय राऊत यांनी नुकतीच गोव्याला भेट दिली होती. त्यात उपराज्यप्रमुख आणि शिवसेनेचे प्रवक्ते जितेश कामत यांना राऊत यांनी बढती देत राज्य प्रमुखपदी बसविले. त्यामुळे शिवेसनेच्या कोणत्याही पत्रकार परिषदेत उपस्थित न राहिलेल्या राज्यप्रमुख शिवप्रसाद जोशी यांची गच्छंती झाली. मात्र, कामत यांच्या निवडीच्यावेळी खासदार राऊत यांनी आपणास बाजूला का करण्यात येत आहे, याचे स्पष्टीकरण दिले नव्हते. असे जोशी म्हणाले.

दरम्यान, ”पक्षविरोधी कारवाया केल्यानं हकालपट्टीचे करण्यात आली, असे वृत्त समोर आहे. त्यामुळे आम्ही कोणत्या कारवाया केल्या, याचे उत्तर नूतन राज्यप्रमुख जितेश कामत आणि गोवा प्रभारी संजय राऊत यांनी द्यावे”, अशी मागणी जोशी यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच शिवसेनेच्या विविध ठिकाणच्या पदाधिका-यांनी आपले मत मांडताना कामत आणि प्रभुदेसाई यांच्या कामावर टीका केली. त्याचबरोबर जोशी यांची हकालपट्टी केल्याच्या निषेधार्थ २४ पदाधिका-यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.